अमरावती - मनपा आयुक्तांकडून ईव्हीएम मशीन, स्ट्राँगरुमची पाहणी
अमरावती, 6 जानेवारी, (हिं.स.)महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या अनुषंगाने आतापर्यंत मतदानासाठी आवश्यक 1200 कंट्रोल युनिट व 2400 बॅलेट युनिट प्राप्त झाले आहे. हे ई.व्ही.एम. मशीन मध्य प्रदेश मधून प्राप्त झाले आहे.
तपासणीअंती ओके ईव्हीएम झोन कार्यालयात दाखल  मनपा आयुक्तांकडून ईव्हीएम मशीन, स्ट्राँगरुमची पाहणी


अमरावती, 6 जानेवारी, (हिं.स.)महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या अनुषंगाने आतापर्यंत मतदानासाठी आवश्यक 1200 कंट्रोल युनिट व 2400 बॅलेट युनिट प्राप्त झाले आहे. हे ई.व्ही.एम. मशीन मध्य प्रदेश मधून प्राप्त झाले आहे. या ईव्हीएमची तपासणी सुरु आहे. दरम्यान, तपासणीअंती ओक झालेल्या काही ईव्हीएम सांस्कृतिक भवन येथून निवडणूक झोन कार्यालयात देण्यात आल्या आहे. दरम्यान, निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगर पालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सोमवार, 05 जानेवारी 2026 रोजी अमरावती येथील सांस्कृतिक भवन परिसरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (एश्ट) गोदामाची सविस्तर पाहणी करून आढावा घेतला.

कार्यपद्धती, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई.व्ही.एम. यंत्रांच्या साठवणूक, सुरक्षा व व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या उद्देशानेही पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ई.व्ही.एम. साठवणूक व व्यवस्थापन केंद्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती पाहून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.ई.व्ही.एम. मशीनची सुरक्षित साठवणूक, नोंदणी, देखभाल, तांत्रिक तपासणी तसेच गोदामातील सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.

पडताळणीबाबत सूचना

गोदामातील सीसीटीव्ही व्यवस्था, प्रवेश नियंत्रण, रजिस्टर व कागदपत्रांची पडताळणी याबाबतही त्यांनी सूचना केल्या. ई. व्ही.एम. संदर्भातील सर्व कामकाज हे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

ईव्हीएम झोन कार्यालयात रवाना

अमरावती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगरपालिका निवडणूकीतील आतापर्यंत 1200 कंट्रोल युनिट व 2400 बॅलेट युनिट प्राप्त झाले आहे. सदर ई.व्ही.एम. मशीन मध्य प्रदेश मधून प्राप्त झाले आहे. आज सांस्कृतिक भवन येथून निवडणूक झोन कार्यालयात ई.व्ही.एम. मशीन देण्यात 'आल्या आहे. मा. आयुक्त महोदयांनी संवेदनशील भागासाठी मायक्रो ऑब्झर्वर यांची नियुक्ती केलेली आहे. या पाहणीदरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ई. व्ही.एम. व्यवस्थापनाशी निगडीत कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande