
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६६ वा दीक्षांत समारंभ थाटात संपन्न झाला. अत्यंत शिस्तीत अवघ्या ७० मिनिटांत हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला.
या समारंभास पुणे येथील ’आयसर’ या राष्ट्रीय संस्थेचे संचालक डॉ.सुनील भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ नाटयगृहात सकाळी १श सदर कार्यक्रम सुरु झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, परीक्षा मंडळ संचालक डॉ.बी.एन.डोळे , वित्त व लेखाधिकारी सविता जम्पावाड. विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र शिरसाठ, डॉ.संजय साळुंके,डॉ.वैशाली खापर्डे, डॉ.वीणा हुंबे यांची उपस्थिती होती.
दीक्षांत समारंभात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ व मार्च-एप्रिल २०२५ या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. या दोन्ही परिक्षेत पदविका, पदवी, पदव्यूत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी तसेच २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या दरम्यान पीएच.डी प्राप्त करणा-या २६९ संशोधकांनी पदव्यांचे वितरण करण्यात आले. यंदाच्या दीक्षांत सोहळयास पदवी प्राप्त करण्यासाठी ६४ हजार ४०७ आवेदन पत्र दाखल झाले. यामध्ये पदवीधर ५१ हजार ९४२ पदव्यूत्तर पदवीधारक, पदवी १२ हजार ४६५, एमफील व पीएच.डीधारक २६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाविद्यालयातील दीक्षांत समारंभ स्वतंत्र होणार आहेत. तर पदव्यूत्तर पदवी धारकांना संबंधित विभागात पदव्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
यंदाच्या दीक्षांत समारंभात पीएच.डी स्नातकांना प्रत्यक्ष मंचावर कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.या दीक्षांत समारंभ २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या काळात आवेदन दाखल केलेल्या २६९ संशोधकांना मंचावरुन पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा - १०४, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाख - २०, मानव्य विज्ञान विद्याशाखा - ९९ तर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा ४६ असे २६९ संशोधक संधोधकांना पीएच.डी पदवी देण्यात आली.
पदवी घेऊन बाहेत पडत असतांना आपले विद्यापीठाशी असलेले नाते आता बदलणार आहे. विद्यापीठाशी असलेले आपण एक भागीदार होणार असून स्वतःच्या ध्येयाचे शिल्पकारही आपणच आहात, याची जाणीव ठेवा, असे आवाहन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोपत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis