
नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत व्यापारी नागरिकांची बैठक संपन्न झाली. भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रभाग क्रमांक १९ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागनाथ स्वामी यांच्या निवासस्थानी कौठा बसवेश्वर नगर येथील व्यापारी नागरिकांची बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी डॉक्टर अजित गोपछडे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis