अंगारकी चतुर्थी निमित्त नवगन राजुरी येथे भाविकांची मोठी गर्दी
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)। मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या निमिताने नवगण राजुरी येथे गणेश दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. नवगण राजुरी येथील गणेश मंदिरात असलेला गणपती नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे. त्यामुळे प्रत्येक चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला
अंगारकी


Q


बीड, 06 जानेवारी (हिं.स.)। मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या निमिताने नवगण राजुरी येथे गणेश दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. नवगण राजुरी येथील गणेश मंदिरात असलेला गणपती नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे. त्यामुळे प्रत्येक चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

मराठवाड्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने नवगन राजुरी येथे येतात बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी राजकीय नेत्यांचा देखील मोठा राबता आहे. मंगळवारी पहाटेपासूनच गणपती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

बीड नगरपरिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका तसा बीड नगर परिषदेतील गटनेत्या सारिका क्षीरसागर यांनी

सकाळी अंगारकी चतुर्थीच्या निमिताने नवगण राजुरी येथे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या समवेत श्री.गणरायाचा अभिषेक करत आरती केली. या निमित्ताने उपस्थित भाविकांना चतुर्थीच्या निमिताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande