नाशिक - दोन्ही माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश
नाशिक, 06 जानेवारी (हिं.स.)। नाशिकमध्ये महापौर राहिलेल्या दोन नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरातील दोन माजी महापौरांनी पक्षांतर केले आहे.महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये असले
नाशिक - दोन्ही माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश


नाशिक, 06 जानेवारी (हिं.स.)। नाशिकमध्ये महापौर राहिलेल्या दोन नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरातील दोन माजी महापौरांनी पक्षांतर केले आहे.महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये असलेले माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन महाराज वाघ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला आणि प्रभाग क्रमांक 13 मधून ते प्रत्यक्ष निवडणूक रिंगणामध्ये नसले तरी विनायक पांडे यांची सून आणि यतीन वाघ यांची पत्नी निवडणूक रिंगणामध्ये आहे. नंतर पुन्हा माजी महापौर अशोक मुर्तडक व दशरथ पाटील हे दोघे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आणि शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासमवेत माजी खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. अशोक मुर्तडक हे प्रभाग ५ मधील शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आहेत. दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande