चंद्रपूर - समाजासाठी मार्गदर्शक पत्रकारिता करू - बंडूभाऊ लडके
चंद्रपूर, 6 जानेवारी (हिं.स.)। मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिला अभिवादन करुन आपण समाजासाठी मार्गदर्शक पत्रकारिता करू या. असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांनी व्यक्त केले. च
चंद्रपूर - समाजासाठी मार्गदर्शक पत्रकारिता करू - बंडूभाऊ लडके


चंद्रपूर, 6 जानेवारी (हिं.स.)। मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिला अभिवादन करुन आपण समाजासाठी मार्गदर्शक पत्रकारिता करू या. असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन मंगळवार दि.6 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. दै. सन्नाटा कार्यालय,मनप व्यापार संकुल, गांधी चौक, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय प्रतिनिधी मुरलीमनोहर व्यास आणि बबनराव बांगडे यांनी पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी मुरलीमनोहर व्यास म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचे बिजारोपण केले पण आज मराठी पत्रकारितेचा वटवृक्ष झालेला आहे. पत्रकारिता केवळ वृतपत्रिय राहिली नसुन इलेक्ट्रॉनिक आणि दृश्यश्राव्य झालेली असून आतातर मोबाईल मुळे सोशल मिडियाचा इतका विकास झालेला आहे कि प्रत्येक जण स्वतःला पत्रकार समजून वाटेल ते, वाटेल त्या भाषेत लिखाण करू लागला आहे. हे प्रवृत्ती समाजासाठी घातक आहे. सोशल मीडियाचा उपयोग सामाजिक एकता, समरसता,प्रेम, सदभाव आणि राष्ट्रप्रेम विकसित करण्यासाठी होणे आवश्यक आहे.

दीपक देशपांडे म्हणाले, पत्रकारितेचा विकास विस्तृत झालेला आहे. सोशल मिडिया मुळे आज पत्रकारितेची व्याख्या बदलण्याची वेळ आलेली आहे असे वाटते. पत्रकार कुणाला म्हणावे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. केंद्रीय प्रतिनिधी बबन बांगडे व सरचिटणीस सुनील तिवारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन सरचिटणीस सुनील तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन रवि नागपूरे यांनी केले. या प्रसंगी शोभाताई जुनघरे, नामदेव वासेकर, विजय लडके, जयंत पाडवाड आदि पत्रकारांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande