
चंद्रपूर, 6 जानेवारी, (हिं.स.)। किडनी तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक डॉ. रवींद्रपाल सिंगच्या अंतरिम जामिनाच्या सुनावणीवर बोलताना बुधवारी सत्र न्यायालय आदेश देणार आहे.
किडनी प्रत्यारोपण प्रकरणात दिल्ली न्यायालयाने दिलेल्या ट्रांझिक्ट रिमांडनुसार दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंग यांचा अंतरिम जामीन मंजूर झाल्यावर त्याची पुढील सुनावणी सोमवारी चंद्रपूर सत्र न्यायालयात मंगळवारी होणार होती. स्थानिक गुन्हे शाखेकडून यावर म्हणणे मांडण्यात आले.
चंद्रपूर पोलिसांनी डॉ. रवींद्रपाल सिंग याला आधीच अटक केली होती, मग अटकपूर्वक जमानतीचा अर्ज कसा असा प्रश्न उपस्थित केला. तो जामीन अर्जच खारिज करण्याची मागणी केली. त्यावर आज सुनावणी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव