
अमरावती, 06 जानेवारी (हिं.स.) शासनाच्या विविध शीर्षकांतर्गत गावात दोन कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या चार रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत नागपूरच्या कार्यालयात तक्रार झाल्याने ते रस्ते वादग्रस्त ठरले आहे. सदर रस्त्यांच्या बाबतीत चौकशींचा ससेमिरा सुरु झाल्याने संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या कालावधीत नागरी सुविधा सण २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत पनोट येथे वार्ड क्रमांक तीन मध्ये दोन ठिकाणी, वार्ड क्रमांक चार येथे एक ठिकाणी आणि वार्ड क्रमांक पाच मध्ये एक ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. सदरची चारही कामे अंदाजपत्रकानुसार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे. असा आरोप करून तक्रारीचे निराकरण होईपर्यंत कंत्राटदारांना बिल अदा करण्यात येऊ नये. अशा आशयाची तक्रार वार्ड क्रमांक चार मध्ये राहणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीकडून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंचायत समिती अचलपूर यांच्याकडे करण्यात आली होती.प्राप्त तक्रारीनंतर सदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्या चारही रस्त्यांची चौकशी व गुणवत्ता तपासणी करण्यात आली होती. परंतु त्यावर तक्रारदाराचे समाधान न झाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची गांभीर्याने दखल घेत पंकज वानखडे उपविभागीय अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग अचलपूर यांनी राज्य गुणवत्ता निरीक्षक श्रेणी २ नागपूर येथील कामांना पंचायत समितीचे यांना पत्राद्वारे ग्रामपंचायत पथ्रोट संबंधित अभियंता यांच्या सोबत कामांची तपासणी करण्यात यावी. जेणेकरून तक्रार करता यांना उपोषणापासून परावृत्त करण्यात येईल अशी विनंती केली आहे.त्या अनुषंगाने गुणवत्ता तपासणी अधिकाऱ्यांच्या चमूने तपासणी केली आहे. पुढे त्यावर आहे. सदर रस्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊनकाय निर्णय दिला जातो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे चौकशीची टीम गावात पोहोचण्याआधीच कारवाईच्या धास्तीने आधीच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा सिमेंट काँक्रीटचे लेपन करण्याचे कॉन्ट्रॅक्टदाराकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी