छ. संभाजीनगर - जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। आपल्या देशाच्या लोकशाहीच्या अन्य तीन स्तंभांवर प्रहरी म्हणून लक्ष ठेवून माध्यमांनी लोकशाही बळकट करण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे, असे प्रतिपादन प्रभारी उपसंचालक प्रशांत दैठणकर यांनी आज येथे केले. जिल्हा मा
चौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। आपल्या देशाच्या लोकशाहीच्या अन्य तीन स्तंभांवर प्रहरी म्हणून लक्ष ठेवून माध्यमांनी लोकशाही बळकट करण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे, असे प्रतिपादन प्रभारी उपसंचालक प्रशांत दैठणकर यांनी आज येथे केले.

जिल्हा माहिती कार्यालयात समिती सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रभारी उपसंचालक प्रशांत दैठणकर यांच्या हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, ज्येष्ठ पत्रकार डॉ.रामभाऊ अग्रवाल, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी सतिष औरंगाबादकर, किशोर महाजन, अब्दुल गनी शेख, राजू वाघमारे, रतन साळवे, रामनारायण जोशी, सईद शेख, वाय.के. नारायणपूरकर, सुरेश क्षीरसागर, नदीम सौदागर, विजय अवसरमल, कल्याण अन्नपूर्णे, सतिष जाधव, सुरेश साळवे, डॉ. शेख अफसर, राजेश सोनवणे, जकी नवाब पटेल, सुजित ताजने, आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व उपस्थित पत्रकारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी आपलेमनोगत व्यक्त केले. राजू वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande