नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकावर मोठे संकट
नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। मागील चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्याच्या परिसरात ढगाळ वातावरण कायम असून सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे. याचा थेट परिणाम रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांवर होत असून, आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शे
नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकावर मोठे संकट


नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। मागील चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्याच्या परिसरात ढगाळ वातावरण कायम असून सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे. याचा थेट परिणाम रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांवर होत असून, आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. पावसाची शक्यता व सततचे धुके कायम राहिल्यास रब्बी हंगामही हातचा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यंदा समाधानकारक पावसामुळे उशिरा का होईना, मोठ्या प्रमाणावर गहू व हरभऱ्याची पेरणी करण्यात आली. कडाक्याच्या थंडीमुळे पिकांची वाढ चांगली होत असताना गहू जुडीवर थोंब धरू लागला असून हरभरा फुलोऱ्यात आहे. मात्र अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे सकाळी धुके पडत असल्याने गहू थोंबधारणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हरभऱ्याच्या फुलांवर करप येण्याचा धोका असल्याचे जाणकारांचे मत आहे. सध्या गहू व हरभरा पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी आणखी काही दिवस ढगाळ वातावरण व धुके कायम राहिल्यास रब्बी हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.ढगाळ वातावरण व धुके आणखी काही दिवस कायम राहिल्यास रब्बी हंगामालाही मोठा फटका बसण्याची शक्यता असून, यंदा शेती उत्पन्नातून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी चिंताजनक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande