सर्वसमावेशक शिक्षणाची गरज - शिक्षणतज्ज्ञ
राज्यस्तरीय मुख्याधापक अधिवेशनाची सगरोळीत सांगता नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे झालेल्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण, सैनिकी शिक्षण, क्रीडा व संस्कृती
Education experts believe there is a need for inclusive education.


राज्यस्तरीय मुख्याधापक अधिवेशनाची सगरोळीत सांगता

नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)।

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे झालेल्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण, सैनिकी शिक्षण, क्रीडा व संस्कृती अशा सर्वसमावेशक शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञांनी केले.

या अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनास राज्यातील दोनशेहून अधिक मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, सचिव डॉ. जयंत जकाते, सुनिल देशमुख, संजीव सगरोळीकर, राजेश महाराज देगलूरकर, संजय पाटील शेळगावकर उपस्थित होते. पहिल्या दिवशी पल्लवी कोष्टी, शरद जाधव, मेजर चंद्रसेन कुलथे, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर या तज्ज्ञांनी कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षणासोबतच सैनिकी शिक्षणाचे महत्त्व विशद केले.

प्राचार्य मृगांक पांडे यांनी नवीन युगातील शिक्षण क्षेत्रातील अत्यावश्यक कौशल्ये, पौराणिक

नैतिक शिक्षण आणि सद्यस्थितीतील भारतीय शिक्षणाच्या गरजा या विषयी आपले मत मांडले. शिक्षणाधिकारी दिलीप बनसोड यांनी बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांनी देशोदेशीच्या शिक्षणपद्धतींची भारतातील शिक्षणव्यवस्थेशी तुलना करत कृतीयुक्त शिक्षणाची नितांत गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये विषयाचे पूर्ण आकलन व सखोल ज्ञान असणे आवश्यक असून सध्याच्या परिस्थितीत त्याची कमतरता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक अरविंद देशमुख यांनी बदलत्या काळाची पावले ओळखून कार्य केल्यास प्रत्येक उपक्रम अधिक परिणामकारक, उत्कृष्ट होऊ शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सखोल अभ्यास करून त्याची प्रभावी अंमलबजावणी मुख्याध्यापकांनी सुरू करावी असे आवाहन केले. या दोन दिवसीय अधिवेशनाचा उपयोग आपल्या प्रशालेच्या सर्वांगीण यशासाठी होईल असा विश्वास उपस्थित मुख्याध्यापकांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande