शेतकऱ्यांना अपघातानंतर तातडीची व प्रभावी वैद्यकीय मदत मिळावी- आमदार सुरेश धस
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)।आष्टी विधानसभा मतदारसंघाची भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य कागदे यांची सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघातील रुग्णांना वैद्यकीय सहायता निधी मिळण्याबाबत
शेतकऱ्यांना अपघातानंतर तातडीची व प्रभावी वैद्यकीय मदत मिळावी


बीड, 06 जानेवारी (हिं.स.)।आष्टी विधानसभा मतदारसंघाची भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य कागदे यांची सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघातील रुग्णांना वैद्यकीय सहायता निधी मिळण्याबाबत तसेच निधीसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.

या चर्चेदरम्यान ग्रामीण भागातील शेतकरी शेतीची कामे करत असताना शेतीयुक्त अवजारे, ट्रॅक्टर, मळणी यंत्र, कडबा कुट्टी मशीन, रोटावेटर, ट्रॅक्टर ट्रॉली आदींमध्ये काम करताना अपघात झाल्यास उपचारासाठी सध्या वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळत नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. या विषयावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी संबंधित नियमांमध्ये शिथिलता देण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.

आमदार सुरेश धस यांनी सांगितले,यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी थेट संवाद साधून, शेतकऱ्यांना अपघातानंतर तातडीची व प्रभावी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आवश्यक सुधारणा करण्याबाबत सखोल चर्चा केली. शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या हितासाठी हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचा ठाम निर्धार आहे. असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande