
इगतपुरी, 06 जानेवारी (हिं.स.)। इगतपुरी नगरपरिषदेत गेल्या ३० वर्षांपासून एकहाती सत्ता असल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास न केल्याने मतदारराजाने यंदा त्यांना डावलत नवीन उमेदवारांना विकासकामे करण्याची संधी दिली. शहराचा विकास होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी आम्ही कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
इगतपुरी नगरपरिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा, गटनेते व उपनगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविका यांच्या पदभारप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपलब्ध हिरामण खोसकर यांनी विकासासाठी आमदार निधीबरोबरच नगरविकास मंत्रालयातूनही निधी करून सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष शालिनी खातळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, गटनेते फिरोज पठाण व सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार दादा भुसे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, बिरसा ब्रिगेडचे अनिल गभाले यांनी केला.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक उमेश कस्तुरे, युवराज भोंडवे, राजेंद्र जावरे, भुषण जाधव, रोहिदास डावखर, सागर आढार, सतीश मनोहर, नगरसेविका भारती शिरोळे, आशा थोरात, अंजुम कुरेशी, नाझनीन खान
आशा भडांगे, उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV