पहिल्या महिला महामंडलेश्वर माँ गीता भारती यांचे अहमदाबाद येथे महानिर्वाण
सोलापूर, 06 जानेवारी (हिं.स.)। आध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ आणि जुनी पंचायती निर्वाणी आखाड्याच्या प्रमुख, पहिल्या महिला महामंडलेश्वर माँ गीता भारती (संतोषी पुरी माता) यांचे गुजरातमधील अहमदाबाद येथे वयाच्या ८५व्या वर्षी महानिर्वाण झाले. त्यांच्य
पहिल्या महिला महामंडलेश्वर माँ गीता भारती यांचे अहमदाबाद येथे महानिर्वाण


सोलापूर, 06 जानेवारी (हिं.स.)।

आध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ आणि जुनी पंचायती निर्वाणी आखाड्याच्या प्रमुख, पहिल्या महिला महामंडलेश्वर माँ गीता भारती (संतोषी पुरी माता) यांचे गुजरातमधील अहमदाबाद येथे वयाच्या ८५व्या वर्षी महानिर्वाण झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरसह देशभरातील लाखो अनुयायांवर शोककळा पसरली आहे.

माँ गीता भारती यांचा जन्म हरिद्वार येथे झाला होता. त्यांच्या प्रगाढ विद्वत्तेमुळे आणि उल्लेखनीय आध्यात्मिक कार्याची दखल घेत भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना ‘गीता भारती’ ही मानाची पदवी बहाल केली होती. सोलापुरातील प्रसिद्ध पुरोहित जिल्हा पंतुलु यांच्या त्या आध्यात्मिक गुरू होत्या. सोलापुरातच त्यांचे सुमारे ६५ हजार अनुयायी असल्याचे सांगितले जाते.

कुंभमेळ्याच्या इतिहासात माँ गीता भारती यांना अत्यंत मानाचे स्थान होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा तसेच नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभमध्ये शाहीस्नानाच्या वेळी पहिल्या महिला महामंडलेश्वर म्हणून गंगापूजनाचा पहिला मान त्यांना मिळाला होता.

त्यांच्यावर मंगळवारी दुपारी ३ वाजता अहमदाबाद येथे धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या महानिर्वाणाने एक तेजस्वी आध्यात्मिक पर्व संपले असून अनुयायी आणि साधुसंत वर्गातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande