छ.संभाजीनगर : एक लक्ष ४५ हजार वृक्ष लागवड व जलसंधारण उपक्रमांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)।गांधेली ग्रामपंचायत अंतर्गत साई टेकडी परिसरात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन मार्फत केलेल्या एक लक्ष ४५ हजार वृक्ष लागवड व जलसंधारण उपक्रमांची पाहणी करण्यात आली. गट विकास अधिकारी श्रीमती मिना र
एक लक्ष ४५ हजार वृक्ष लागवड व जलसंधारण उपक्रमांची पाहणी


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)।गांधेली ग्रामपंचायत अंतर्गत साई टेकडी परिसरात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन मार्फत केलेल्या एक लक्ष ४५ हजार वृक्ष लागवड व जलसंधारण उपक्रमांची पाहणी करण्यात आली. गट विकास अधिकारी श्रीमती मिना रावतळे यांनी ही पाहणी केली.

या अंतर्गत साई टेकडी परिसरात वृक्ष लागवड, रोपांची गुणवत्ता, वाढ व दीर्घकालीन टिकाव, सिंचन, संरक्षण व नियमित देखभाल व्यवस्था, जलसंधारणाची विविध कामे व त्यांचा भूजलस्तरावर होणारा सकारात्मक परिणाम, ग्रामपंचायत गांधेली व स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग यासह उपक्रमाच्या नियोजन, अंमलबजावणी व प्रत्यक्ष परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या उपक्रमामुळे साई टेकडी परिसरात हरित आच्छादनात लक्षणीय वाढ, पर्यावरणीय संतुलन, तसेच पर्यटन स्थळाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडत आहे. वृक्षलागवड आणि जलसंधारणाचा समन्वय हा शाश्वत पर्यावरणीय व पर्यटन विकासाचा आदर्श नमुना ठरत आहे. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पर्यावरण संवर्धन, जलसुरक्षा, जैवविविधता संरक्षण आणि स्थानिक विकास य्चे दृष्य परिणाम दिसत आहेत.पाहणी दरम्यान कृषी अधिकारी दिनकर जाधव, विस्तार अधिकारी सोळशे, सरपंच मन्नू शेख, ग्रामपंचायत अधिकारी सलोनी खरात, अभियान सहयोगी दयानंद माने, जिल्हा कार्यक्रम समन्वयक किरण बिलोरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande