नांदेड-किनवट, माहूर, उनकेश्वर येथील बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर
नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटूनहीमहाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या किनवट तालुक्याचा परिपूर्ण विकास झाला पाहिजे, यासाठी, आ. भीमराव केराम यांनी आपल्या विकासकामांच्या माध्यमातून हा अनुशेष भरून काढण्यास सुरुवात केली आहे
नांदेड-किनवट, माहूर, उनकेश्वर येथील बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर


नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटूनहीमहाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या किनवट तालुक्याचा परिपूर्ण विकास झाला पाहिजे, यासाठी, आ. भीमराव केराम यांनी आपल्या विकासकामांच्या माध्यमातून हा अनुशेष भरून काढण्यास सुरुवात केली आहे पैनगंगा बारा महिने भरुन राहली तर पाणी टंचाई कायम दूर होण्यासाठी किनवट, माहूर उनकेश्वर. येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे काम प्रगती पथावर आहे. शेतकऱ्यांना विजेची अडचण येऊ नये या करीता महावितरण कंपनीकडून किनवट शहरासह राजगड आणि पार्डी येथे प्रत्येकी ३३ के. व्ही. चे तीन नवीन सबस्टेशन मंजूर करण्यात त्यांना यश आले असून - यामुळे तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे

निजामकालीन इतिहास लाभलेल्या किनवट शहराला १९६० पासून रेल्वे मार्ग जोडला गेला आहे. तरीही, जिल्हा मुख्यालयापासून १५० कि. मी.अंतरावर असल्याने या भागाकडे आजवरच्या अनेक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. अनेक नेत्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा देत स्वतःचा विकास साधण्यात धन्यता मानली, अशी खंत सर्वसामान्यांतून व्यक्त होत होती. हीच 'शोकांतिका' ओळखून आमदार केराम यांनी शासनाच्या तिजोरीतून मोठा निधी खेचून आणत तालुक्याचा सर्वांगीण कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande