नांदेड : वारकरी संस्थेसाठी एक एकर जमीन दान
नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नवयुवकांना कीर्तनकार, भागवतकार व भजनी अशा धार्मिक मार्गाचे संस्कार मिळावेत, समाजात जागृती निर्माण व्हावी आणि तरुण व्यसनाधीनतेपासून दूर राहावेत, या उदात्त हेतूने नंदगाव येथील मोहिते
नांदेड : वारकरी संस्थेसाठी एक एकर जमीन दान


नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नवयुवकांना कीर्तनकार, भागवतकार व भजनी अशा धार्मिक मार्गाचे संस्कार मिळावेत, समाजात जागृती निर्माण व्हावी आणि तरुण व्यसनाधीनतेपासून दूर राहावेत, या उदात्त हेतूने नंदगाव येथील मोहिते कुटुंबातील अनिल देवराव मोहिते यांनी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.

मांडवी येथे आयोजित श्री संगीतमय विष्णू महापुराण कथेच्या कार्यक्रमात, किनवट तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत आणि साक्षीने, अनिल मोहिते यांनी वारकरी संप्रदायाच्या संस्थेसाठी नंदगाव येथे एक एकर जमीन दान देण्याचा संकल्प जाहीर केला. या निर्णयामुळे परिसरात समाधान व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रस्तावित वारकरी संस्थेमार्फत परमपूज्य आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट-माहूर परिसरातील नवयुवक व सुशिक्षित होतकरू विद्यार्थ्यांना धार्मिक व सांस्कृतिक शिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून या भागातील जनतेसाठी एक नवे अध्यात्मिक दालन खुले होणार आहे. तसेच परमहंस लहरी बाबा यांच्या वारकरी जाणार असल्याची माहिती भाजप ओबीसी आघाडीचे दक्षिण तालुका अध्यक्ष अनिल देवराव मोहिते यांनी दिली. या निःस्वार्थ आणि समाजोपयोगी उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, दुर्गम भागातील तरुणाईला योग्य दिशा देणारा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande