
लातूर, 06 जानेवारी (हिं.स.)। माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा स्वाती सचिन हुडे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी आ.संजय बनसोडे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
आ.संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक - २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीचा दणदणीत विजयी होवुन थेट जनतेतून उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी स्वाती सचिन हुडे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.
यावेळी शहरातील २० प्रभागातील ४० नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भगवानराव पाटील तळेगावकर, सुधीर भोसले, माजी नगरसेवक सचिन हुडे, मंजुर पठाण, ज्येष्ठ नागरिक शंकर हुडे, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे,अमोल अनकल्ले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, आज पासून नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहून सेवा करावी व आपली नगर परिषद ही लातूर जिल्ह्यात नंबर एकची नगर परिषद म्हणून नावारुपाला आणावे असे आवाहन केले.
जगाच्या नकाशावर आपल्या उदगीरची एक नवी ओळख निर्माण झाली असुन आपली संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी करावे.
विकासाच्या कामासाठी हातात हात घालुन काम करा आणि शहरातील सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा पुरवा असे सांगितले. येत्या सहा महिन्याच्या आत नुतन इमारतीच्या कामाला सुरुवात करणार असुन एक भव्य दिव्य व देखणी इमारत आपण उभारणार असलचयाचेही आ.संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis