
रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) | मुंबई विद्यापीठ पुरुष आणि महिला तायक्वांदो स्पर्धेत येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने पुरुष व महिला संघाने उज्ज्वल कामगिरी केली.
महाविद्यालयाच्या व महिला संघाने १ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक आणि २ कास्य पदके मिळविली आणि सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. गेल्या २ ते ५ जानेवारी या काळात मुंबई विद्यापीठ मार्गताम्हाणे (गुहागर) येथील डॉ. तात्यासाहेब नातू, आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या. स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघात कु. श्रुति चव्हाण (५४ किलो) सुवर्णपदक, कु. समर्था बने (४६ ते ४९ किलो) रौप्य पदक, कु. सई सावंत (+ ७३ किलो) कु. पार्थ गावडे (५४ ते ५८ किलो) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुरुष संघातील कु. सुजल सोळंके (६८ ते ७४ किलो) कास्य पदक पदक आणि कु. देवेन सोपल (५४ किलो) कास्य पदक मिळवून विजेते ठरले.या संघांना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रशिक्षक शाहरूख शेख, प्रा. कल्पेश बोटके यांचे मार्गदर्शन, तर जिल्हा तायकवाँदो असोशिएशनचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व विजयी खेळाडूंचे महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी