छ. संभाजीनगर : नैसर्गिक शेती फायदेशीर; कृषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। नैसर्गिक शेतीत जीवामृत, बीजामृताचा वापर मातीची सुपिकता वाढवतो. रासायनिक निविष्ठांचा वापर टाळल्याने खर्चात बचत होते. ही शेती फायदेशीर ठरत असल्याचा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे. कन्नड, खुलताबाद, गंगापूर व वैज
छ. संभाजीनगर : नैसर्गिक शेती फायदेशीर; कृषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। नैसर्गिक शेतीत जीवामृत, बीजामृताचा वापर मातीची सुपिकता वाढवतो. रासायनिक निविष्ठांचा वापर टाळल्याने खर्चात बचत होते. ही शेती फायदेशीर ठरत असल्याचा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे. कन्नड, खुलताबाद, गंगापूर व वैजापूर तालुक्यातील कृषी सखींसाठी झालेल्या प्रशिक्षणात नैसर्गिक शेतीचे पैलू उलगडण्यात आले.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत कृषी सखींसाठी एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शिबिर घेण्यात आले.

विषय विशेषज्ञ स्वप्नील वाघ यांनी मातीच्या सुपिकेतवर मार्गदर्शन केले. तर गटचर्चेद्वारे प्रमुख अडचणींवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीकडे असलेला दृष्टिकोन, प्रात्यक्षिकांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी निरीक्षण याबाबतच्या अडचणी मांडण्यात आल्या. प्रदीप चोबे यांनी शेतकरी संघटन, शंकानिरसन व नैसर्गिक शेतीतील सातत्यावर प्रकाश टाकला. डॉ. पुरुषोत्तम जोशी यांनी जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, नीमास्त्र इत्यादी निविष्ठांच्या तयारी व वापरावर तसेच आंतरपीक व बहुपदरी शेती पद्धतीवर मार्गदर्शन केले.

माती आरोग्य व्यवस्थापन, पीक नियोजन, बीजप्रक्रिया, पीक उत्पादन तंत्रज्ञान तसेच नैसर्गिक कीड व रोग व्यवस्थापनावर चर्चा व प्रात्यक्षिके घेण्यात आली. क्लस्टर स्तरावर नैसर्गिक शेती मॉडेल शेतांची उभारणी व प्रभावी प्रात्यक्षिक शेत रचनेवर

मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाचे राज्य समन्वयक सुनील चौधरी, कृषी अधिकारी ऋतुजा राऊत, निशांत पवार यांनी कृषी सखींशी संवाद साधला. एमजीएम गांधेली परिसराचे संचालक डॉ. के. ए. धापके व वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. के. सुकासे यांनी केंद्राच्या प्रक्षेत्रावरील नैसर्गिक शेती प्रयोगांबाबत विवेचन केले. डॉ. वैशाली इनामदार व सहकाऱ्यांनी नैसर्गिक शेती प्रमाणीकरण प्रक्रियेची माहिती दिली. प्रशिक्षणासाठी गांधेली परिसराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, 'आत्मा'च्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव, डॉ. ए. के. पडिले यांनी मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande