पिंपरीत २२ जागांवर माजी नगरसेवक समोरासमोर; तीन प्रभागांत पती-पत्नी मैदानात
पिंपरी, 6 जानेवारी, (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत २२ जागांवर ४७ माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी सत्तारूढ पक्षनेते, माजी स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते व पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. त्यामुळे लढतीची रंगत वाढली
PCMC


पिंपरी, 6 जानेवारी, (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत २२ जागांवर ४७ माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी सत्तारूढ पक्षनेते, माजी स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते व पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. त्यामुळे लढतीची रंगत वाढली आहे. निकालानंतर एका माजी नगरसेवकाचा विजय होणार असून पराभूत माजी नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे.कुदळवाडी, बोऱ्हाडेवाडी प्रभाग क्रमांक दोनमध्ये माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे व अश्विनी जाधव यांच्यात लढत आहे.

भोसरी, गवळीनगर प्रभाग पाचमध्ये माजी नगरसेविका भीमाबाई फुगे विरुद्ध अनुराधा गोफणे रिंगणात आहेत. नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा कॉलनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले विरुद्ध माजी नगरसेवक सद्गुरू कदम अशी लढत आहे. तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधून माजी नगरसेवक पंकज भालेकर विरुद्ध शांताराम भालेकर समोरासमोर आहेत.

निगडी यमुनानगर प्रभाग क्रमांक १३ मध्ये मनसेचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक सचिन चिखले विरुद्ध माजी नगरसेवक उत्तम केंदळे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे विरुद्ध अश्विनी चिखले तसेच तानाजी खाडे, रवींद्र खिलारे, शशिकिरण गवळी हे तीन माजी नगरसेवकही एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. चिंचवड स्टेशन, आकुर्डी, काळभोरनगर प्रभाग क्रमांक १४ मध्ये मीनल यादव विरुद्ध वैशाली काळभोर, प्रसाद शेट्टी विरुद्ध प्रमोद कुटे हे माजी नगरसेवक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande