वृक्ष लागवड वाढविण्यावर भर द्या - परभणी जिल्हाधिकारी
परभणी, 06 जानेवारी (हिं.स.)। शासनाच्या सामाजिक वनीकरण योजनांची प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांशी समन्वय साधून माहितीची देवाणघेवाण करावी, वृक्ष लागवड वाढविण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यां
वृक्ष लागवड वाढविण्यावर भर द्या - परभणी जिल्हाधिकारी


परभणी, 06 जानेवारी (हिं.स.)। शासनाच्या सामाजिक वनीकरण योजनांची प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांशी समन्वय साधून माहितीची देवाणघेवाण करावी, वृक्ष लागवड वाढविण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वनीकरण विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची आढावा बैठक आज संपन्न झाली. बैठकीस विभागीय वन अधिकारी मनोहर केवलदास गोखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक दौलत चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), उपजिल्हाधिकारी (रोहयो), सामाजिक वनीकरण परभणीचे सहाय्यक वनसंरक्षक तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक वनीकरण अंतर्गत अधिकाधिक वृक्षलागवड वाढविण्यासाठी रस्ते, कालवे, लोहमार्ग दुतर्फा तसेच गट लागवडीसाठी उपलब्ध क्षेत्रांची सविस्तर माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक वृक्ष लागवड वाढविण्यावर विशेष भर देण्यात यावा, जेणेकरून पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande