एकनाथ शिंदे-अजित पवार एकत्र आले तर फडणवीसांचे सरकार पडेल - राजू खरे
सोलापूर, 06 जानेवारी (हिं.स.)। राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आ
Patil Mohite


सोलापूर, 06 जानेवारी (हिं.स.)। राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले तर फडणवीस यांचे सरकार पडेल असे राजकीय विधान खरे यांनी केले आहे.सध्या राज्यात महापालिकांच्या निवडणुका चालू आहेत. यामध्ये महायुतीतील मित्रपक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वच काही ठीक आहे, असे वातावरण नाही. अशातच मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी रविवारी (ता. ४) एका कार्यक्रमात फडणवीस सरकार पडेल, असे वक्तव्य केले आहे.एकनाथ शिंदेंकडे ६० आणि अजित पवारांकडे ४२ आमदार आहेत आणि इतर अपक्ष सोबत आले, हे सगळे सरकारमधून बाहेर पडले तर फडणवीस मुख्यमंत्री राहतील का? हे सरकार पडले ना? असे म्हणत आमदार खरे खळबळ उडवून दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande