पिंपरी विधानसभा मतदारसंघात ८ प्रभाग, ३२ नगरसेवक
पुणे, 6 जानेवारी, (हिं.स.)पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडीपर्यंतच्या दोन्ही बाजूंचा समावेश असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात ८ प्रभाग असून, ३२ नगरसेवकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक ९ खराळवाडी, गांधीनगर, नेहरुनगरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा
पिंपरी विधानसभा मतदारसंघात ८ प्रभाग, ३२ नगरसेवक


पुणे, 6 जानेवारी, (हिं.स.)पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडीपर्यंतच्या दोन्ही बाजूंचा समावेश असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात ८ प्रभाग असून, ३२ नगरसेवकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक ९ खराळवाडी, गांधीनगर, नेहरुनगरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ आणि प्रभाग १० मोरवाडी, शाहूनगरमधून भाजप आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे निवडणूक रिंगणात असल्याने या लढती लक्षवेधी आहेत. येथे बनसोडे आणि गोरखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या विधानसभा मतदारसंघात २०१७ च्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १७ आणि भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग ९ मधील चारही उमेदवार तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक १९ विजयनगर, आनंदनगर, गावडे पार्क, भीमनगर, भाटनगर या प्रभागातून भाजपचे चारही नगरसेवक विजयी झाले होते. तत्कालीन शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande