
सोलापूर, 06 जानेवारी, (हिं.स.) - महापालिका निवडणुकीमध्ये आता रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. प्रभागात तिरंगी सोडून ही लढती होत आहेत. यंदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने सुद्धा सर्वच पक्षांसमोर आपले आव्हान उभे केले आहे. विशेष करून प्रभाग 14 मधील लढत हे लक्षवेधी ठरणारे आहे या ठिकाणी कायमच प्रभागातील जनतेच्या अडीअडचणीला हाकेला धावून जाणारे जुबेर हिरापुरे तसेच अश्फाक बागवान हे दोन उमेदवार उभे आहेत.
हे दोन्ही युवा उमेदवार असल्याने सर्वाधिक मतदार असलेल्या मुस्लिम समाजामध्ये त्यांची छाप दिसून येते.
या प्रभागात आम आदमी पार्टी सह काँग्रेस पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, समाजवादी पक्ष इतक्या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात मुस्लिम समाज सोडून इतर समाजाचेही मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजपने सुद्धा यंदा आव्हान दिले आहे.
या प्रभागातील नागरिकांशी संपर्क साधला असता जुबेर हिरापुरे आणि अशपाक बागवान यांच्या काम आणि संपर्कावर नागरिक समाधानी असून आम आदमी पक्षाचे पार्टी जड असल्याचे बोलले जाते. घरोघरी प्रचार आणि पदयात्रेस त्यांना प्रतिसाद मिळत असून आमच्या येणाऱ्या जुबेर आणि अश्फाक यांच्या पाठीशी आम्ही या निवडणुकीत सोबत राहू असे नागरिक सांगत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड