
सोलापूर, 6 जानेवारी, (हिं.स.)। भाजपावाले रात्री १० नंतर शहरात फिरतील, त्यांच्यावर लक्ष ठेवा. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून भाजप महिलांची अब्रू विकत घेण्याचा प्रयत्न करेल, असे वादग्रस्त विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. हेरिटेज येथे महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभात त्या बोलत होत्या.
ही महापालिका निवडणूक म्हणजे स्वातंत्र्यांची दुसरी लढाई असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासठी प्रत्येकजण या लढाईत सहभागी व्हा. निवडणूक बिनविरोध कशी होऊ शकते असा सवाल करत मतदान यंत्रावर नोटा बटण असताना उमेदवार बिनविरोध कसा होऊ शकतो. भाजपा सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. बिनविरोधसाठी खुनाची घटना घडणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचा प्रकार आहे. यामुळे प्रचार काळात प्रत्येकाने भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा करावे, असे आवाहन प्रणिती यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड