पुणे जिल्हा परिषद आरोग्यसेवक अटकेत; उपसंचालक अडचणीत
पुणे, 6 जानेवारी, (हिं.स.) पुणे परिमंडळात आरोग्यसेवकाच्या बदलीसाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्यसेवक रामकिसन गंगाधर घ्यार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत आरोपी आणि उपसंचालक डॉ.
पुणे जिल्हा परिषद आरोग्यसेवक अटकेत; उपसंचालक अडचणीत


पुणे, 6 जानेवारी, (हिं.स.) पुणे परिमंडळात आरोग्यसेवकाच्या बदलीसाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्यसेवक रामकिसन गंगाधर घ्यार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत आरोपी आणि उपसंचालक डॉ. भगवान पवार यांचा फोनवरून बरेचदा संपर्क आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डॉ. पवार यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, डॉ. पवार सोमवारी तातडीने मुंबईला रवाना झाल्याचे समजते.

तक्रारदार आरोग्यसेवकाची गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यात बदली झाली. त्याने इंदापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदी बदलीसाठी अर्ज केला होता. परंतु, डॉ. भगवान पवार यांनी तक्रारदाराला नवीन प्रशासकीय इमारतीतील आरोग्य उपसंचालक कार्यालयात रुजू करून घेतले. घ्यार हा कर्मचारी डॉ. भगवान पवार यांच्या संपर्कातील असून, त्याला भेटण्याबाबत डॉ. पवार यांनी सांगितल्याची नोंद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. आरोपी घ्यार यानेही चौकशीत ‌‘साहेबां‌’च्या सांगण्यावरून व्यवहार केल्याची कबुली दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande