सिल्लोड आगारात सुरक्षा अभियान, विजयकुमार काळवणे यांनी दिल्या सूचना
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)।एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सुरक्षितता अभियानाचे सिल्लोड आगारात उद्घाटन करण्यात आले. या वेळी आगारप्रमुख विजयकुमार काळवणे यांनी कर्मचाऱ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले. संपूर्ण राज्यभर एसटी म
सिल्लोड आगारात सुरक्षा अभियान, विजयकुमार काळवणे यांनी दिल्या सूचना


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)।एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सुरक्षितता अभियानाचे सिल्लोड आगारात उद्घाटन करण्यात आले. या वेळी आगारप्रमुख विजयकुमार काळवणे यांनी कर्मचाऱ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले.

संपूर्ण राज्यभर एसटी महामंडळाच्या वतीने सुरक्षितता अभियान राबविण्यात येते त्यानुसार एक जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत सुरक्षितता मासिक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उद्घाटन प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे, रवींद्र सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी आगारप्रमुख विजयकुमार काळवणे यांनी कर्मचाऱ्यांनी या सुरक्षितता अभियानाच्या अनुषंगाने चालकांनी अतिवेगाने वाहन चालवू नये, वाहकाच्या मदतीशिवाय गाडी मागे घेऊ नये, चुकीच्या पद्धतीने पुढील वाहनाला ओलांडून जाऊ नये, वाहनाचा वेग आवश्यक तेथे कमी करणे, योग्य ती सावधगिरी घेऊन वाहन थांबविणे, पुढील वाहनाला मागे टाकून अयोग्यरित्या मध्येच वाहन काढू नये, पुढील वाहन व आपले वाहन यात आवश्यक ते अंतर राखणे, आवश्यक ती काळजी घेऊन वळण घेणे, घाट चढताना, उतरताना 'लो गिअर' चा वापर करणे आदी महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक बाबूराव पंडित यांनी केले. या कार्यक्रमास आगारातील चालक वाहक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande