संत गाडगे बाबा विद्यापीठात कर्मचारी संघाची निवडणूक; 1 फेब्रुवारीला मतदान
अमरावती, 6 जानेवारी, (हिं.स.)। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघाची निवडणूक १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी घेतली जाईल. विद्यापीठाने यासंबंधीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणूक अ
संत गाडगे बाबा विद्यापीठात कर्मचारी संघाची निवडणूक:1 फेब्रुवारीला मतदान आणि निकाल एकाच दिवशी


अमरावती, 6 जानेवारी, (हिं.स.)। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघाची निवडणूक १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी घेतली जाईल. विद्यापीठाने यासंबंधीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून ऋतुराज दशमुखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विद्यापीठाच्या विद्या विभागातील संजय खोब्रागडे आणि मोहन इंगळे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मदत करतील. निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, निवडणूक प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली. १६ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर १९ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येतील, त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ४ वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नामांकन अर्जांची विक्री केली जाईल. त्यानंतर सलग दोन दिवस, म्हणजेच २० आणि २१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत नामांकन अर्ज स्वीकारले जातील. निवडणुकीचे कामकाज कर्मचारी भवन येथे चालणार आहे.

नामांकन स्वीकारण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी असून, त्याच दिवशी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजता उमेदवारांची वैध आणि अवैध यादी जाहीर होईल. २२ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल, ज्याची अंतिम तारीख २३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर लगेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत विद्यापीठातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृहात मतदान होईल. मतदानानंतर लगेचच दुपारी २ वाजल्यापासून मतमोजणी सुरू केली जाईल आणि मतमोजणी पूर्ण होताच निकाल घोषित केला जाईल.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande