परभणी : शिल्पा निलावाड यांची लेखा अधिकारीपदी निवड
परभणी, 06 जानेवारी (हिं.स.)। पूर्णा येथील तहसिल कार्यालयातील कर्मचारी शिल्पा उत्तमराव निलावाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वित्त विभागात लेखाधिकारी वर्ग - १ या पदावर निवड झाली आहे. पूर्णा तहसील कार्यालयात मागील दोन महिन्यापासून पुरवठा विभ
शिल्पा निलावाड यांची लेखा अधिकारीपदी निवड


परभणी, 06 जानेवारी (हिं.स.)। पूर्णा येथील तहसिल कार्यालयातील कर्मचारी शिल्पा उत्तमराव निलावाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वित्त विभागात लेखाधिकारी वर्ग - १ या पदावर निवड झाली आहे.

पूर्णा तहसील कार्यालयात मागील दोन महिन्यापासून पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या शिल्पा निलावाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून वित्त विभागात लेखाधिकारी वर्ग एक या पदासाठी निवड झाली आहे नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये त्यांची या पदासाठी निवड झाली आहे.

यापूर्वी त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पूर्णा येथील तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत होत्या. त्या बी.कॉम, बी. टेक पदवीधारक आहेत. या यशाबद्दल तहसीलदार माधवराव बोथीकर, तहसिलदार उत्तमराव निलावाड, कोषागार अधिकारी प्रकाश कोत्तावार, ॲड. संजय गव्हाणे, नायब तहसिलदार सतीश नाईक, पंढरीनाथ शिंदे, प्रशांत थारकर, राजेश्वरी बचाटे, उज्वला पुलावाड, सतीश टाकळकर, संपत तेली आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande