नांदेड मध्ये शिवसेनेला (शिंदे) निश्चितच बहुमत मिळेल - आ. हेमंत पाटील
नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेला निश्चित यश मिळेल बहुमत मिळेल आणि भगवा फडकेल असे विधान नांदेडचे शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी केले. नांदेड येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभा
नांदेड-वाघाळा  महानगरपालिका निवडणूक -२०२६  प्रभाग क्र.१७ जनसंपर्क कार्यालय उदघाटन  शिवसेनेच्या  प्रचाराला सुरवात झाल्यानंतर आज प्रभाग क्र १७ मध्ये शिवसेनेचे  अधिकृत उमेदवार रवींद्रसिंग बुंगई, बिरबल यादव, ज्योती खेडकर, हारमिंदर कौर गिल,यांच्या प्रचारार्थ  मिल गेट परिसरात जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर, सरदार  माजी मनपा सभापती सरजितसिंग गिल, अवतारसिंग पहरेदार, रणजितसिंग गिल,चिरागिया, महेंद्र (टिंगू ) खेडकर ,शेख सलीम,अब्दुल खयूम,डॉ.मस्तान आरिफभाई  यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते  उपस्थित होते.


नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेला निश्चित यश मिळेल बहुमत मिळेल आणि भगवा फडकेल असे विधान नांदेडचे शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी केले.

नांदेड येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्र.१७ जनसंपर्क कार्यालय उदघाटन आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या प्रचाराला जोरदार सुरवात झाली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. प्रभाग क्र १७ मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रवींद्रसिंग बुंगई, बिरबल यादव, ज्योती खेडकर, हारमिंदर कौर गिल,यांच्या प्रचारार्थ मिल गेट परिसरात जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर, सरदार माजी मनपा सभापती सरजितसिंग गिल, अवतारसिंग पहरेदार, रणजितसिंग गिल,चिरागिया, महेंद्र (टिंगू ) खेडकर ,शेख सलीम,अब्दुल खयूम,डॉ.मस्तान आरिफभाई यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande