सोलापूर - प्रभाग 22 मध्ये सर्वाधिक 36 तर सर्वांत कमी उमेदवार प्रभाग 2 मध्ये
सोलापूर, 06 जानेवारी (हिं.स.)।सोलापूर शहरातील 26 प्रभागांमध्ये महापालिकेची निवडणूक होत असून प्रभाग 22 मध्ये सर्वाधिक 36 उमेदवार तर सर्वांत कमी उमेदवार प्रभाग दोनमध्ये आहेत. बहुतांश प्रभागांत बहुरंगी आणि पंचरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. काही निवडक
smc


सोलापूर, 06 जानेवारी (हिं.स.)।सोलापूर शहरातील 26 प्रभागांमध्ये महापालिकेची निवडणूक होत असून प्रभाग 22 मध्ये सर्वाधिक 36 उमेदवार तर सर्वांत कमी उमेदवार प्रभाग दोनमध्ये आहेत. बहुतांश प्रभागांत बहुरंगी आणि पंचरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. काही निवडक प्रभागांमध्ये केवळ दोन उमेदवार आमने- सामने असल्याने तेथे थेट व प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे.उमेदवारांच्या संख्येच्या बाबतीत प्रभाग क्रमांक 26 आघाडीवर असून येथे सर्वाधिक 36 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या प्रभागात मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता व्यक केली जात आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक 17 मध्ये 34, प्रभाग 1 मध्ये 30 उमेदवार, प्रभाग 5, 6, 14, 23 मध्ये प्रत्येकी 27 उमेदवार आहेत. प्रभाग 29 मध्ये 25 उमेदवार आहेत. तर सर्वात कमी उमेदवार प्रभाग 2 मध्ये आहेत. 12 उमेदवार आखड्यात आहेत. त्यानंतर इतर प्रभागामध्ये 15 पासून 20 पर्यंत उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande