बंडखोरी केलेल्या उमेदवारांना रवींद्र चव्हाण यांचा कारवाईचा इशारा
सोलापूर, 6 जानेवारी, (हिं.स.)। सोलापूर महानगरपलिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कारवाईचा इशारा दिला. जे कोणी बंडखोर आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला तत्काळ पाठिंबा द्यावा, अन्यथा पक्ष शिस्
bjp


सोलापूर, 6 जानेवारी, (हिं.स.)। सोलापूर महानगरपलिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कारवाईचा इशारा दिला. जे कोणी बंडखोर आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला तत्काळ पाठिंबा द्यावा, अन्यथा पक्ष शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशाराच त्यांनी दिला. जुळे सोलापुरातील जामगुंडी लॉन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते.

प्रारंभी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते. राज्य आणि जिल्हा पातळीवरील अनेक समित्या आहेत. पालिकेत सत्ता आल्यानंतर तेथेही संधी मिळू शकते याचा विचार बंडखोरांनी करावा. कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, मतदारांपर्यंत पोहोचवावे. पंंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसांतील 16- 16 तास काम करतात. कार्यकर्त्यांनीही याच पद्धतीने पक्ष कार्याला वेळ दिला पाहिजे, असे आवाहन करत चव्हाण म्हणाले, वर्षानुवर्षे पक्षासाठी कार्य केलेल्या कार्यकर्त्यांवर बंडखोरी केली म्हणून कारवाई करावी याचे वाईट वाटते. त्यामुळे बंडखोरी मागे घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande