नांदेड जिल्ह्यातील धोंडगे बंधू शिंदे सेनेच्या वाटेवर
नांदेड, 6 जानेवारी, (हिं.स.) - नांदेड जिल्हा परिषदेचीआगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून कंधार-लोहा तालुक्याच्या राजकारणातील दिग्गज धोंडगे बंधू हे आता शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. या पक्षाचे उपनेते आ. हेमंत पाटील व आ. बाबुराव
असले तरी, त्यामागे शिंदेसेनेची 'आस' आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा


नांदेड, 6 जानेवारी, (हिं.स.) - नांदेड जिल्हा परिषदेचीआगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून कंधार-लोहा तालुक्याच्या राजकारणातील दिग्गज धोंडगे बंधू हे आता शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. या पक्षाचे उपनेते आ. हेमंत पाटील व आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी त्यांच्या काबरानगरस्थित निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. चर्चा झाली. या चर्चेचा तपशिल अद्याप बाहेर आला नसला तरी, धोंडगे बंधू शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा यानिमित्त राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली आहे.

तेलंगणा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या 'बीआरएस' पक्षामध्ये लोहा-कंधारचे माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी बस्तान मांडले होते. परंतु तेलंगणा विधानसभा निवडणुकीतबीआरएसचा निभाव लागला नाही. परिणामी केसीआर यांनी महाराष्ट्र राज्यात आपल्या बीआरएसचा विस्तार करण्याचा मनसुबा अर्धावर सोडला. त्यानंतर माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी महाराष्ट्रात एमआरएस पक्षाची स्वतंत्र गुढी उभारली. त्यांचे दोन्ही सुपुत्र शिवराज धोंडगे व माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे हे एमआरएचा झेंडा गावोगावी पोहचविण्याचा प्रयत्न करु लागले होते. विधानसभेच्या काही जागा

लढविण्याचा या पक्षाचा अजेंडा होता. परंतु ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून एमआरएसने माघार घेतली. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कोणत्याही क्षणी बिगूल वाजू शकतो अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे नांदेड-शहर वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ज्या प्रमाणे शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये आघाडी झाली, त्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उपरोक्त दोन राजकीय पक्षात आघाडी होवू शकते, ही बाब हेरुन धोंडगे बंधू शिवसेना (शिंदे) पक्षाचा 'पर्याय' निवडत असावेत, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

दरम्यान शहरातील काबरा नगरस्थित निवासस्थानी आ. हेमंत पाटील व आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी भेट दिली असता, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी जि.प. उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे, शिवराज धोंडगे, पुष्पाताई शिवराज धोंडगे आदी उपस्थित होते. ही भेट ही सदिच्छा होती असे वरकरणी म्हटले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande