प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागातील प्रचाराला अधिक गती मिळणार-भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक २ येथील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्पा उत्तमराव रोजतकर, श्री. सागर पाले, सौ. सुवर्णलता उल्हास पाटील साळवे, श्री. राज वानखे
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागातील प्रचाराला अधिक गती मिळणार


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक २ येथील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्पा उत्तमराव रोजतकर, श्री. सागर पाले, सौ. सुवर्णलता उल्हास पाटील साळवे, श्री. राज वानखेडे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २ चे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उपस्थितीत संपन्न झाले. राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी खासदार भागवत कराड यांची उपस्थिती होती भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे संघटन, कार्यकर्त्यांची मेहनत, विकासाचा ठोस अजेंडा आणि जनतेचा वाढता विश्वास यामुळे भाजप अत्यंत सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागातील प्रचाराला अधिक गती मिळणार असून, घराघरात भाजपचा विकासाचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक २ मध्ये कमळ निशाणीला भरघोस पाठिंबा मिळवून भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त करण्याचा आत्मविश्वास यावेळी स्पष्टपणे दिसून आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande