
नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य -पुणे अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे आयोजित पिंपरी चिंचवड महानगर पालिका,निगडी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात किनवट तालुक्यातील आदिवासी युवकांनी पारितोषिक पटकावले.
लोकनृत्य या कलाप्रकारात आदिवासी दंडार नृत्यास प्रथम पारितोषिक पटकावत दिल्ली येथील भारत मंडपम येथे निवड झाली आहे. नांदेड जिल्ह्यासाठी अभिनंदन बाब असल्याचा उल्लेख आमदार हेमंत पाटील यांनी केला.
विजेत्या संघाचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना आर्थिक सहकार्य केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रथमेश मेश्राम ,रितेश मडावी ,संकेत जुगनाके ,पुरुषोत्तम आत्राम ,पियुष तोडसाम ,शिवम सुतार ,सुनील खलूले ,शुभम कोडापे ,अनंत खलुले व या सर्व लोकनृत्याची धुरा सांभाळणारा संकेत गाडेकर यांचा समावेश होता.या विजयात ज्यांचा सहभाग राहिला ते संघव्यवस्थापक डॉ.संदीप काळे सर,डॉ.शिवराज शिंदे सर ,डॉ .पांडुरंग पांचाळ सर आणि संदेश हटकर (नृत्य दिग्दर्शक) उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis