छ. संभाजीनगर - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते दानवे आणि खैरे कार्यक्रमात एकत्र
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील द्वंद्व सुरू आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत रशीद मामू यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब
स्व. सौ. मीनाताई ठाकरे यांना अभिवादन


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील द्वंद्व सुरू आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत रशीद मामू यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश दिल्यावरून चंद्रकांत खैरे प्रचंड नाराज आहेत. मात्र आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने खैरे आणि दानवे एकत्र आल्याचे दिसले.

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा ९५ वा जन्मदिन म्हणजेच ‘ममता दिनानिमित्त शिवाई ट्रस्ट, शिवसेना भवन संभाजीपेठ येथे स्व. सौ. मीनाताई ठाकरे यांना अभिवादन केले.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, कृष्णा पाटील डोणगावकर, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटिका सुनीता देव, जिल्हा संघटक आशा दातार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande