रत्नागिरी : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रतीकचिन्हाचे अनावरण
रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) | देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. संस्थेच्या या खास वर्षानिमित्त संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमाच्या औचित्याने संस्थेने खास बनवलेल्या प्रतीकचिन्
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रतीकचिन्हाचे अनावरण


रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) | देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. संस्थेच्या या खास वर्षानिमित्त संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमाच्या औचित्याने संस्थेने खास बनवलेल्या प्रतीकचिन्हाचे (लोगोचे) अनावरण प्रमुख अतिथी अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतीक चिन्हाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सातत्याने तेवत राहणारे ज्ञानदीप आहेत, संस्थेच्या नऊ उपक्रमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ चांदण्या आहेत आणि यापुढेही शेकडो वर्षे भरारी घेण्याचे प्रतीक म्हणून गरुडपंख आहेत. त्याचबरोबर यामध्ये संस्थेचा मूळ लोगो समाविष्ट आहे. तसेच 'ज्ञानदानाचा शतक महोत्सव' हे संस्थेचे शंभर वर्षाचे कार्यही दाखविण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षाच्या प्रतीकचिन्हातून संस्थेचा देदीप्यमान इतिहास आणि महत्त्वाकांक्षी भविष्य दर्शविण्यात आले आहे.

या प्रतीकचिन्हाचे आरेखन कोल्हापूर येथील प्रसिद्ध आरेखन तज्ज्ञ श्रीपाद रामदासी यांनी केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande