जळगावमध्ये तापमानात ३ अंशांपर्यंतची घट
जळगाव, 06 जानेवारी (हिं.स.)जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात चढ उतार दिसून येत असून एकाच दिवसात ५ अंशाहून अधिकची वाढ झालेल्या किमान तापमानात ३ अंशांपर्यंतची घट नोंदविण्यात आली. ज्यामुळे जळगावकरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. ढगाळ वातावरण आणि ताशी १५
जळगावमध्ये तापमानात ३ अंशांपर्यंतची घट


जळगाव, 06 जानेवारी (हिं.स.)जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात चढ उतार दिसून येत असून एकाच दिवसात ५ अंशाहून अधिकची वाढ झालेल्या किमान तापमानात ३ अंशांपर्यंतची घट नोंदविण्यात आली. ज्यामुळे जळगावकरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. ढगाळ वातावरण आणि ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले असून, आगामी काही दिवस असाच गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जळगावचे किमान तापमान १० अंशाखाली घसरले होते. सलग तीन दिवस किमान तापमान ९ अंशाच्या घरात होते. मागच्या दोन दिवसात अचानक वातावरणात बदल दिसून आला. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ज्यामुळे शनिवारी ९.१ अंशांवर असलेल्या किमान तापमानाचा पारा रविवारी तब्बल ५.४ अंशांनी वाढून १५.५ अंशांवर पोहोचले होते. परिणामी रविवारी सकाळी थंडीची तीव्रता जाणवली नाही.मात्र जळगावचे कमाल तापमान ३ अंशांनी घटल्याने जळगावकरांना भरदिवसाही हुडहुडी भरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande