
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वच्छ आणि निर्मळ मनपा प्रशासनासाठी तसेच जातीपात धर्मविरोधी राजकारण संपविण्यासाठी मतदान करा असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
प्रभाग क्रमांक 17 चे शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवारसौ. अरुणा राजकुमार जाधवश्री. अशपाक अब्दुल रशीद कुरेशीसौ. वंदना गोपाळ कुलकर्णीश्री. विनायक सुधाकर देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले.
घनकचरा व्यवस्थापन कंत्राट घोटाळा, हिबाबनामा जमीन घोटाळा आणि हॉटेल विट्स बळकवणाऱ्या शासन, प्रशासनाविरोधात एकजूट होऊन स्वच्छ आणि निर्मळ मनपा प्रशासनासाठी तसेच जातीपात धर्मविरोधी राजकारण संपविण्यासाठी मतदान करा असे आवाहन यावेळी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना यावेळी अंबादास दानवे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis