सोलापूर - यंदा बॅलेट युनिटवर उमेदवारांचे नाव आणि चिन्हांच्या पुढे वेगवेगळे रंग
सोलापूर, 06 जानेवारी, (हिं.स.) - सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून यंदाची मतदान प्रक्रिया थोडी वेगळी राहणार आहे. यंदा बॅलेट युनिटवर उमेदवारांचे नाव आणि चिन्हांच्या पुढे वेगवेगळे रंग
सोलापूर - यंदा बॅलेट युनिटवर उमेदवारांचे नाव आणि चिन्हांच्या पुढे वेगवेगळे रंग


सोलापूर, 06 जानेवारी, (हिं.स.) - सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून यंदाची मतदान प्रक्रिया थोडी वेगळी राहणार आहे. यंदा बॅलेट युनिटवर उमेदवारांचे नाव आणि चिन्हांच्या पुढे वेगवेगळे रंग असलेल्या मतपत्रिका असणार आहेत. प्रभाग एक ते 24 साठी चार वेगवेगळे मतपत्रिका तर 25 आणि 26 साठी तीन वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असणार आहेत. प्रभाग एक ते 24 साठी चार मतदान तर 25 आणि 26 साठी मतदारांना तीन मतदान करावे लागणार आहे. पूर्ण मतदानाची प्रक्रिया झाल्याशिवाय बीपिंगचा आवाज येणार नाही, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.

यंदा प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. ‌‘अ‌’ जागेसाठी पांढरा, ‌‘ब‌’ जागेसाठी फिका गुलाबी, ‌‘क‌’ जागेसाठी फिका पिवळा तर ‌‘ड‌’ जागेसाठी, फिका निळा रंग असणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना रंगांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 24 मधील मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या जागेसाठी बटन दाबल्यानंतर उमेदवाराच्या नावासमोरील लाल दिवा लागेल, मात्र बीप आवाज येणार नाही. चौथ्या व शेवटच्या जागेसाठी मतदान केल्यानंतर दीर्घ बीप आवाज येईल. याच बीप आवाजानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande