नेमकं बाहेरचे कोण ?; आ. निलंगेकर यांचा सवाल
लातूर, 06 जानेवारी (हिं.स.)। संभाजी पाटील निलंग्याचे, अभिमन्यू पवार औश्याचे, रमेश कराड रेणापूरचे असे सांगत काँग्रेसकडून दिशाभूल केली जात आहे.पंरतु माझे घर प्रभाग १७ मध्ये आहे. अभिमन्यू पवार प्रभाग १३ मध्ये राहतात. डॉ. अर्चना पाटील प्रभाग १५ मध्ये
नेमकं बाहेरचे  कोण ? : आ. निलंगेकर यांचा सवाल


लातूर, 06 जानेवारी (हिं.स.)। संभाजी पाटील निलंग्याचे, अभिमन्यू पवार औश्याचे, रमेश कराड रेणापूरचे असे सांगत काँग्रेसकडून दिशाभूल केली जात आहे.पंरतु माझे घर प्रभाग १७ मध्ये आहे. अभिमन्यू पवार प्रभाग १३ मध्ये राहतात. डॉ. अर्चना पाटील प्रभाग १५ मध्ये राहतात. माजी खा. सुनिल गायकवाड प्रभाग १२ मध्ये राहतात तर आ. रमेश कराड यांचे घरही महापालिकेच्या हद्दीतच आहे. आमच्यावर टीका करणारे अमित देशमुख मात्र मनपा हद्दीच्या बाहेर बाभळगावात राहतात. मग खरा बाहेरचा कोण ? असा सवाल आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला.

माझे शिक्षण छत्रपती शाहू महाविद्यालयात झाले. रमेशअप्पा कराड रामेश्वर येथे शिकले. डॉ. अर्चनाताई यांचे शिक्षण लातूर येथेच झाले अभिमन्यू पवार केशवराज विद्यालयात शिकले अमित देशमुख मात्र मुंबईत राहून शिकले त्यांना लातूरच्या समस्यांची जाणिवही नाही, असेही आ. निलंगेकर म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande