छ. संभाजीनगर - सामुदायिक विवाह उत्साहाचे 'सौदागर एज्युकेशनल' तर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)। दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना आपल्या मुलामुलींचे विवाह करणे अत्यंत अवघड होत आहे. यामुळे विवाहाचे वय खूप वाढत आहे. याचे भान ठेवून रविवारी येथील सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क
सामुदायिक विवाह उत्साहात 'सौदागर एज्युकेशनल' तर्फे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)।

दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना आपल्या मुलामुलींचे विवाह करणे अत्यंत अवघड होत आहे. यामुळे विवाहाचे वय खूप वाढत आहे. याचे भान ठेवून रविवारी येथील सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सौदागर बिरारीच्या 'सौदागर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी'तर्फे गोरगरीब कुटुंबातील २० सामुदायिक विवाह येथील तेली पंच मंगल कार्यालययात मोठ्या उत्साह व आनंदात पार पडले.

या वीस नवविवाहित जोडप्यांना समाजातील काही दानशूर व्यक्तींनी त्यांना संसारोपयोगी वस्तू ही दिल्या. आयोजक शमीम सौदागर यांनी या सामुदायिक विवाह आयोजनाची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी व शिल्पा परदेशी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिल शेख, नगरसेवक रियाज शेख, विशाल संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती.

बारा प्रभागांतून निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनाही स्मृतीचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मालेगाव, श्रीरामपूर, येवला, संभाजीनगर, कोपरगाव, कन्नड, व राज्याच्या इतर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर ए काझी हाफिजोद्दीन व मशिदीचे नादीम यांनी विधी पूर्ण केला. धनंजय धोर्डे, पंकज ठोंबरे, कय्युम सौदागर, शब्बीर सौदागर, बिलाल सौदागर, सुलतान कुरेशी, आमिरअली, सावन राजपूत, दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, स्वप्नील जेजुरकर, पारस घाटे हजर होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande