
परभणी, 06 जानेवारी (हिं.स.)। सोनपेठ शहरातील श्री साई द्वारकामाई परिवाराच्या वतीने सोनपेठ ते शिर्डी पाई पालखी सोहळ्याचे या ही वर्षी आयोजन करण्यात आले असून पालखीचे रविवार दि.२५ जानेवारी रोजी प्रस्थान होणार आहे. साई पालखीचे हे १० वे वर्ष आहे.
दि. २५ जानेवारी सकाळी ८ वाजता शहराचे ग्रामदैवत हनुमान मंदिर , हनुमान चौक येथून पालखीचे प्रस्थान होणार असुन सांगता शिर्डी येथे गुरूवार दि. ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे ,११ दिवस चालणाऱ्या या पालखी सोहळ्यात अकरा मुक्काम असून चहा, नाश्ता ,भोजनाची व्यवस्था भक्तांकडून करण्यात आली आहे.
२५ रोजी प्रस्थान होणाऱ्या साई पालखीची शहरातून मिरवणूक करण्यात येणार असून पालखीचे खालील ठिकाणी मुक्काम असणार आहेत - टाकळगव्हाण छोटेवाडी , माऊली फाटा, सिरसदेवी, बाग पिंपळगाव, सुकळी ,येवले वस्ती, कुकाणा ,साईनाथ नगर, गोंदवणी , श्री स्वामी नित्यानंद गोविंद गिरीजी सिद्ध आश्रम शिर्डी व साईबाबा मंदिर असा प्रवास राहणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या साई भक्तांनी दि. २० जानेवारी पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन श्री साई द्वारकामाई परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis