
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)।खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सय्यद आमेर पटेल नगराध्यक्ष पदी तर कॉग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. आता नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी तसेच स्वीकृत सदस्य पदासाठी १३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आयोजन करण्यात आले आहे. सभेचे
या विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. खुलताबाद नगरपरिषदेतील पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नऊ नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे सात नगरसेवक, काँग्रेसचे चार नगर परिषद असे नगरसेवक आहेत. स्वीकृत सदस्य पदी कोणाची निवड होते व उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा १३ जानेवारी दुपारी बारा वाजता नगराध्यक्षांनी बोलावली आहे. या सभेमध्ये उपनगराध्यक्ष
निवड तसेच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. थेट जनतेचे आलेले नगराध्यक्ष असल्याने निवडून नगरसेवक उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीचे मतदान करू शकणार आहेत. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समसमान मते पडल्यास नगराध्यक्ष त्यास असलेल्या अधिकाराचा वापर करून आपल्या मतांचा वापर करता येणार आहे. उपनगराध्यक्षपदी तसेच स्वीकृत सदस्य पदी कोणाची वर्णी लागते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis