अमरावतीत भगवा फडकणारच – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.) निवडणुका पार पडल्यानंतरही सभांमध्ये ‘लाडक्या बहिणींची’ मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी एकदि
निवडणुका नंतरही सभांमध्ये ‘लाडक्या बहिणींची’ गर्दी;  अमरावतीत भगवा फडकणारच – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)

निवडणुका पार पडल्यानंतरही सभांमध्ये ‘लाडक्या बहिणींची’ मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास मोठे यश निश्चित असून अमरावतीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमरावती महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज अमरावतीच्या नेहरू मैदान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात अली होती यावेळी शिंदे म्हणले कि ‘लाडकी बहीण’ योजना बंद करणाऱ्यांना लाडक्या बहिणींनीच खोडा दाखवला असून ही योजना कधीही बंद होणार नाही, असे स्पष्ट करत शिंदे यांनी विकास हाच सेनेचा एकमेव उद्देश असल्याचे सांगितले.संपत्ती किती कमावली हे महत्त्वाचे नसून किती माणसे जोडली हे महत्त्वाचे आहे; शिंदे सेना जोडणारी आहे, तोडणारी नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावत त्यांनी ठाकरे युतीवरही टीकास्त्र सोडले. विकास हा आमचा अजेंडा असून खुर्ची आमचा अजेंडा नाही. खुर्चीच्या मोहासाठी काही लोक एकत्र आले, असे म्हणत शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच, “ज्यांनी वापरलं आणि फेकून दिल अशी आमची शिंदे सेना नाही,” असे ठामपणे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande