अमरावती -  ई -लायब्ररी विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.) वाचनालया सोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध पुस्तकांचा अभ्यास करता यावा यासाठी एक कोटी रुपयांची ई -लायब्ररी विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आली तर दत्तापूर भागातील महत्त्वाच्या असलेल्या पाच
आ.  प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसाला वचनपूर्ती   एक कोटीची ई -लायब्ररी विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल


अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)

वाचनालया सोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध पुस्तकांचा अभ्यास करता यावा यासाठी एक कोटी रुपयांची ई -लायब्ररी विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आली तर दत्तापूर भागातील महत्त्वाच्या असलेल्या पाच कोटीच्या पूलाचे भूमिपूजन करण्यात आले. आ प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसा निमित्त धामणगावात वचनपूर्ती ला सुरुवात झाली आहे.शहरातील दत्तापूर भागात विद्यार्थ्यांसोबत नागरिकांना अनेक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी नगराध्यक्ष अर्चनाताई अडसड रोठे यांनी विकासाचे पहिले पाऊल पुढे टाकले आहे. अमर शहीद भगतसिंग चौक येथे एक कोटीची निर्मित केलेली ई -लायब्ररी विद्यार्थ्यांना समर्पित केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळायला सुरुवात झाली आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार प्रतापदादा अडसड तर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अर्चनाताई अडसड रोठे ,प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश भैय्या होते. वैशिष्ट्यपूर्ण निधीअंतर्गत मंजूर झालेल्या दत्तापूर भागातील पाच कोटीच्या पुलाचे भूमिपूजन यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते करण्यात आले.तालुक्यात आज पावेतो एकही शौचालय उपसा यंत्र नव्हते राज्य शासनाकडून येथील नगरपरिषदेलास्वच्छ महाराष्ट्र अभियान ०.२ अंतर्गत २५ लक्ष रुपयांचे शौचालय उपसा यंत्र वाहन आ. प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नाने मंजूर करून घेतले आहे. आता हे वाहन यंत्र तालुक्यातील जनतेला उपयोगी येणार आहे.यांचे लोकार्पण आ. अडसड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक नरेंद्र चौधरी, डॉ. हेमकरण कांकरीया, गिरीश (बंडू) मूंधड़ा, गोपाल द्विवेदी, रवि कुकरेजा, मुरलीधर पतके, दर्शन राठी, जगदीश रॉय, विलास बूटले, अंशुल श्यामलाल बड़गैया, मंजिरी भोगे, प्रतिभा खोब्रागडे, मनिषा शिरभाते, रीना साहू, रंजना शेलोकार, सीमा बागडे, प्रियंका जवंजाळ, काजल उपरीकर, सीमा पेंदाम, अंजली मार्वे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती

विद्यार्थ्यांनी मानले आभार

अमर शहीद भगतसिंग चौक येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी पूर्वी एक कोटीचे स्वामी विवेकानंद वाचनालय केंद्र तर आता आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळण्यासाठी एक कोटीची ई -लायब्ररी उभारण्यात आल्याने आमदार प्रतापदादा अडसड व नगराध्यक्ष अर्चनाताई अडसड रोठे यांचे येथील उपस्थित विद्यार्थ्यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande