
लातूर, 07 जानेवारी (हिं.स.)लातूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग ८ मधील अभिषेक राजेंद्र पतंगे, रिहानाबेगम ताहेर आली घंटे, श्रावणी बालाजी झिपरे, ऍड. स्नेहल श्रीकांत उडगे, आणि प्रभाग ९ मधील योगेश उमाकांत स्वामी, तबस्सुम मुक्तार शेख, सपना पांडुरंग किसवे, इस्रार जब्बार सगरे यांच्या प्रचारार्थ महात्मा बसवेश्वर महाविद्यालयानजीक आयोजित जाहीर सभेत, मान्यवरांसह उपस्थित राहून आ.अमित विलासरावजी देशमुख साहेब यांनी संबोधित केले
काँग्रेस पक्षाच्या मताचे विभाजन व्हावे म्हणून लातूरमध्ये महायुतीतील, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना हे पक्ष वेगवेगळे लढत आहेत, लातूरचे मतदार हे सुजाण आहेत त्यामुळे त्यांचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही, आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीशी तसेच आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा आपण प्रयत्न केला परंतु येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनात वेगळेच काहीतरी होते, त्यांचा हेतू शुद्ध नव्हता त्यामुळे, त्यांनी भाजपला मदत होईल अशी भूमिका घेतली आहे,
या परिस्थितीत काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत नैसर्गिक आघाडी केली आहे. सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी ही आघाडी म्हणजे आता लातूरचा आत्मा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे,महायुती मधील घटक पक्षांनी कोणत्याही खेळया केल्या, तरी येथे काँग्रेस पक्ष भारी ठरणार आहे , कारण लातूरचा मतदारच 'लय भारी' असल्याचे या सभेत त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis