शासकीय अधिकारी-कर्मचारी ग्रंथ पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)। : पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, संवाद पुणे व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे तर्फे शासकीय अधिकारी-कर्मचारी ग्रंथ पुरस्कार २०२५ साठी नामांकने स्वीकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. शासकीय
शासकीय अधिकारी-कर्मचारी ग्रंथ पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)। : पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, संवाद पुणे व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे तर्फे शासकीय अधिकारी-कर्मचारी ग्रंथ पुरस्कार २०२५ साठी नामांकने स्वीकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. शासकीय सेवेत कार्यरत किंवा सेवानिवृत्त सर्व संवर्गातील अधिकारी-कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र असून केवळ अभिजात, मराठी भाषेतील आणि १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्तीची पुस्तके ग्राह्य धरली जाणार आहेत. संकलित, संपादित, अनुवादित साहित्य तसेच ई-बुक, ऑडिओबुक स्वरूपातील साहित्य विचारात घेतले जाणार नाही.

नामांकने लेखक किंवा त्यांच्या परवानगीने प्रकाशकांकडूनच पाठविणे आवश्यक असून पुस्तकाच्या दोन प्रती व नामांकन अर्जासह पाठविणे अनिवार्य आहे. काव्यसंग्रह वगळता इतर साहित्य किमान १०० पाने असणे अपेक्षित आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ अशी आहे.

निवड समितीचा निर्णय अंतिम राहील व प्राप्त पुस्तके परत पाठविली जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत व्यंकटेश कल्याणकर (मो. 7798703952), माध्यम व प्रकाशन विभाग, यशदा, पुणे यांच्याशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande