परभणी - नूतन विद्यालयात गुरुवारी वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव
परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)। सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री
परभणी - नूतन विद्यालयात गुरुवारी वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव


परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)।

सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त हा सोहळा गुरुवार 8 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धांमध्ये यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत आणि चित्रपट अभिनेते विशाल कुलथे (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, चिटणीस तथा प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी तसेच शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री यांचीही उपस्थिती राहणार आहे. या स्नेहसंमेलनास विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक संतोष पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande